नांदेड l विविध जाती धर्माचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदभावना मंच नांदेडच्या वतीने रमजान निमित्त भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.


ज्ञानमाता शाळेसमोरील के. पी. मोटर्स येथे पवित्र रमजान निमित्त सदभावना मंचच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मंचचे जिल्हाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


आज सामाजिक व राजकीय परिस्थिती एवढी बिकट होत चालली की, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासणे ही काळाची गरज झाली आहे. सदभावना मंच त्यादृष्टीनेच काम करीत असल्याचे मत यावेळी प्रास्ताविकातून सदभावना मंचचे सहसचिव मोहसीन खान यांनी व्यक्त केले. त्यानुसार सर्व वक्त्यांनी आपले विचार मांडले.

मंचावर भंते पय्याबोधी, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम, लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. हनुमंत भोपाळे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शे. रा. पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे माजी प्राचार्य डाॅ. प्रकाश पोपळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते तथा सदभावना मंचचे संघटक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या आभार प्रदर्शनानंतर सामुहिक नमाज अदा करण्यात आली व त्यानंतर स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
यावेळी ऑलिव्ह ट्री इंग्लिश स्कूलचे अझरुद्दीन, आदर्श शिक्षक शिवा कांबळे, राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे महासचिव नामदेव फुलपगार, अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे युवा अध्यक्ष राहुल गोरे, पत्रकार पंढरीनाथ बोकारे, आयुब पठाण, वसीम सेठ, दत्ता तुमवाड, अबरार देशमुख, बालाजी कदम, नानाराव कल्याणकर, धनंजय उमरीकर, सतीष जाधव, प्रविण किनीकर, नवनाथ शिंदे, कपिल पिचेवार, गंगाधर पवार, बाबुराव केंद्रे, अंबादास मंगल, संगमेश्वर लांडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.