नवीन नांदेड l डॉक्टर असोसिएशन सिडको व केमिस्ट असोसिएशन सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर निवघेकर हॉस्पिटल मधील तज्ञ डॉ.श्री विश्वंभर पवार व डॉक्टर सौ.सुरेखा पवार हे मुळव्याध,फिशर व भगंदर इत्यादी गुदमार्गाच्या आजारावर मोफत तपासणी शिबिराचे आयोजन दि. 05 जानेवारी 25 रोजी करण्यात आले होते. या शिबिरातून रुग्णाला ऑपरेशनची आवश्यकता भासल्यास 50% सवतीच्या दरात अवस्थेनुसार इंजेक्शन लेझर शास्त्रद्वारे ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सिडको परिसरातील माजी उपमहापौर विनय गिरडे यांच्या संपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड सिडको नांदेड येथे संपन्न झालेल्या या शिबिरास कार्यक्रमास शिंदे शिवसेना गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, एन.डी.पवार माजी प्राचार्य, त्रंबक कदम, साहेबराव मोरे, रंगराव लोंढे, सोपान पांडे, विनोद कांचन गिरे, माजी नगरसेविका सौ. ललीता शिंदे बोकारे , डॉ.प्रकाश शिंदे ,डॉ.विजयानंद भोंग ,डॉ.अशोक कलंत्री,डॉ.सुरेखा कलंत्री,सूर्यभान मोरे फाजगे,तिरुपती लांडगे,राजू गायकवाड, गोविंद मजरे,दिलीप गिरडे,दिलीप कदम,प्रा.मारुती घोरबांड ,प्रा.संजय घोरबाड प्रा.अनिल घोरबांड ,रवि रायभोळे, यांची उपस्थिती होती.
विनय पाटील गिरडे यांनी निवघेकर हॉस्पिटल मधील डॉ.विश्वंभर पवार व डॉ.सौ.सुरेखा पवार यांच्या गरजू रुग्णांना मोफत उपचार शिबिराच्या उपक्रम शीलतेचे कौतुक केले, या शिबिराचा सिडको हडको सह ग्रामीण भागातील अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला.