HomeनांदेडDoctors Negaligence ; डाॅक्टराच्या हलगर्जीपणमुळे जीव गमवावा लागल्याचा नातेवाईकांचा आरोप

Doctors Negaligence ; डाॅक्टराच्या हलगर्जीपणमुळे जीव गमवावा लागल्याचा नातेवाईकांचा आरोप

देगलूर, गंगाधर मठवाले। शेवाळा येथील मोहन मठ वाले यांच्यात छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर सगरोळी ता. बिलोली येथे असलेल्या खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर देगलूर आणि नायगाव येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी नातेवाईकांनी खूप धावपळ केली;परंतु त्यांना शहरातील कोणतेही डॉक्टर वेळेवर मिळाले नसल्यामुळे जीव कमवा लागला.असा आरोप शेवाळा ता.देगलूर येथील नातेवाईकांनी केला आहे.

देगलूर तालुक्यातील शेवाळा येथील रहिवासी मोहन स्वामी मठवाले यांच्या छातीत दि.२५ मे रोजी वेदना होऊ लागली.त्यांच्यावर सगरोळी येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आला. तरी देखील वेदना कमी न झाल्याने सोमवार दि. २६ मे रोजी सकाळी चार चाकी वाहनाने देगलूर येथील कद्रेकर हॉस्पिटल,श्वास हॉस्पिटल, प्रयागराज इमारतीतील डॉ. तेलंग यांचा दवाखाना, गायकवाड रुग्णालय व इतर खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांविषयी चौकशी केली असता या सर्वच ठिकाणी ‘डॉक्टर खाली आले नाहीत, डॉक्टर नाहीत, डॉक्टर आताच येत नाहीत. अकरा बाराच्या नंतर येतात.’ अशा प्रकारची सर्वच रुग्णालयात उत्तरे मिळाली.

डॉक्टरांच्याकडे इलाजासाठी देगलूरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सतत दोन तास फिरल्यानंतरही एकही डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थितीत मोहन मठवाले यांना घेऊन त्यांच्या नातेवाईकांनी नायगाव गाठले. तेथे देखील डॉ.अनिस शेख उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईक नाईलाजाने रुग्णाला नांदेडकडे घेऊन निघाले. नातेवाईक रुग्णाला घेऊन नांदेड कडे निघाले असता रुग्ण पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे वेदनेने तडफडत होता. शेवटी नांदेड मधील रुग्णालय गाठण्यापूर्वीच मोहन स्वामी मठवाले यांची वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्राणज्योत मावळली.

गेल्या काही वर्षापासून रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील डॉक्टरांनी आपली फीस देखील वाढविली आहे. एवढेच नव्हे तर पूर्वी पुणे-मुंबईत ज्याप्रमाणे डॉक्टर, पॅथॉलॉजी आणि औषधी दुकान यांचे रॅकेट सुरू झाले होते तसेच आता राज्यातील छोट्या शहरात आणि गावात देखील डॉक्टर आणि इतरांचे रॅकेट सुरू झाले असून रुग्णांची सेवा करणे हा भाव कमी झाला असून केवळ पैसा वसुलीसाठी डॉक्टर मंडळी गोरगरीब लोकांची, सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट करीत आहेत.

मोहन मठवाले यांच्या ठिकाणी श्रीमंत घराण्यातील किंवा राजकारणातील रुग्ण असता तर अशाच प्रकारचा हलगर्जीपणा देगलूर,नायगाव येथे शासकीय, खाजगी सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी दाखविला असता का ? असा संतप्त सवाल मठवाले यांच्या नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांच्या भेदभाव पूर्ण वागण्यामुळे मठवाले यांना जीव गमवावा लागला आहे.असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments