नांदेड l पुणे येथे शालेय क्रीडा स्पर्धेतील राज्यस्तरीय जुडो क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या मध्ये विद्यालयाचा खेळाडू नागेश नारायणराव लुटे या विद्यार्थ्याने क्रीडामार्गदर्शक तुकाराम पाटील पुयड यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षाखालील 62 किलो वरील गटातून राज्यात पहिला क्रमांक मिळवून शाळेला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पराक्रम केला.


क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पुणे आयोजित राज्यस्तरीय जुडो क्रीडा स्पर्धा सन २४ चे आयोजन २८ व २९ सप्टेंबर रोजी पुणे येथील म्हाळुंगी क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.

यावेळी मराठवाड्यातील लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणारा नागेश नारायण लुटे यांनी १४ वर्षाखालील ६२ किलो वजन गटात प्रथम येऊन गोल्ड मेडॅल मिळविले आहे,या यशा बदल गुणवंत खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष पी.आर.सरसे संस्थेचे प्राचार्य अजय पाटील सरसे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरसे शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजय खेळाडू नागेश लुटेचे अभिनंदन करून त्यास राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

नागेश लुटे याला प्रल्हाद पाटील, अश्विनी सोळखे , जुदो कोच मार्गदर्शक, रविकिरण डोईफोडे, जगतसिंग गाडीवाले, दिलीप सिंग गाडीवाले, गुरूबचन गाडीवाले, विठ्ठलराव पाटील पुयड,तुकाराम पाटील पुयड, जगन्नाथ पाटील टरके,अमोल कंकाळ, दिगंबर सुताडे, बालाजी वडजकर, माणिक मामा नाईकवाडे बारी पाटेल खुरगाव यांनी मार्गदर्शन केले आहे, या यशाबद्दल नागेश लुटे यांच्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे.
