नांदेड| येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने ‘वसंतदर्पण’ या भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘भारतीय महिलांचे समाज सुधारणेतील योगदान’ या विषयावर सदर विशेषांकाची मांडणी करण्यात आली आहे.
जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसियोद्दीन मुजावर सर यांच्या पार पडलेल्या प्रकाशन समारंभाला वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. साहेबराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले, भित्तीपत्रकाच्या संपादक मंडळाचे सदस्य कु. सोनाली पुयड,पोर्णिमा करे, कु. सृष्टी पुयड, कु. शिवाणी उरूडवाडे, करण पंचलिंगे आणि विश्वनाथ पवार यांनी भित्ती पत्रका विषयी सविस्तर माहिती दिली. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्यंकटेश देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी महाविद्यालयातील प्रो.डॉ.रेणुका मोरे,डॉ.प्रदीप बिरादार, प्रा.डॉ.जी.डॉ.गणेश लिंगमपल्ले, डॉ. सुनिता गरुड,डॉ.नागेश कांबळे, कार्यालयीन अधीक्षक आर.डी.राठोड, डॉ. उत्तम कानवटे, डॉ.आर.एम. कागणे, डॉ. साहेबराव मोरे, डॉ.विजयकुमार मोरे, प्रा.पी.बी.चव्हाण, प्रा.जायदे मॅडम, प्रा.नंदिनी सुधळकर, प्रा.माधव मुस्तापुरे, प्रा. शेख, प्रा.कोतवाल, प्रा. कपील हिंगोले, प्रा.शशीकांत हाटकर, डॉ. लालबा खरात,डॉ.शोभा वाळुक्कर, डॉ.ललिता आय्या, डॉ. सचिन गिरी,प्रा.नितीन मुंडलोड, प्रा. शेख,डॉ.सरोदे यांसह महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.