नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ व ग्रामीण भागातील श्री गणेश मूर्ती विसर्जन झरी खदान येथे १७ ते १८सप्टेंबर चौवीस तास चाल्लेया विसर्जन सोहळ्यात जवळपास अनेक मुर्ती क्रेनचा सहाय्याने व जिवरक्षक दलाच्या सहकार्याने मोठे २१७ व लहान मुर्ती सहा हजार विसर्जन करण्यात आल्या यावेळी मनपा आयुक्त डॉ महेश कुमार ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व मनपा, महसूल, पोलीस अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळ यांनी बसविलेल्या श्री गणेश मुर्ती गोदावरी नदीत विसर्जन न करण्यात झरी खदान येथे विसर्जन करण्यात येणार असल्याचे आवाहन केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी श्री विसर्जन गणपती मुर्ती झरी खदान येथे मनपाच्या वतीने करण्यात आले होते,यावेळी या ठिकाणी आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,यांच्या आदेशानुसार अतिरीक् आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्तअजितपाल संधु सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, संभाजी कास्टेवाड, स्वच्छता विभाग प्रमुख वसीम तडवी,मनपा बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, ऊप अभियंता अरूण शिंदे, कनिषठ अभियंता किरण सुर्यवंशी, विधुत विभाग यांनी विधुत रोषणाई,रस्ते दुरूस्ती करून संबंधित ठिकाणी क्रेनचा सहाय्याने लहान मोठ्या मुर्ती जिवरक्षक दलाच्या वतीने तर झरी या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी एन.जी. कानगुले, मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे ,तलाठी मारोती श्रीरामे, एम.के. पाटील, दिलीप पवार,बालाजी सोनटक्के यांनी गणेशोत्सव निमित्ताने झरी खदान येथे गणेश मूर्ती विसर्जन साठी सहकार्य केले.
१७ सप्टेंबर रोजी सकाळी श्री गणपती मुर्ती सार्वजनिक मंडळाने ढोलताशांच्या गजरात विधीवत पुजन करून विसर्जन स्थळी आणल्या होत्या, यावेळी क्रेनचा सहाय्याने मोठया मुर्ती २१७ तर लहान ६ हजार व जिवरक्षक दलाच्या सहाय्याने विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी मनपाचे अग्न्नी शाम दलाचे अधिकारी दासरे व फायरमन व अग्निशामक दलाचे वाहन होते. झरी खदान येथे ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने अधिकारी, कर्मचारी तर सिडको मनपा क्षेत्रीय कार्यालय कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक मारोती सारंग, प्रकाश दर्शने, वसुली लिपीक मालु एनफळे, सुर्यवंशी,विठ्ठल अंबटवार,नथुराम चवरे, गणेश शिंगे,मदन चौहान, सुधीर कांबळे,शाम आरकुले, लोखंडे,रमेश यशवंतकर,महेद्रं पठाडे, रविद्रं पवळे, यांच्या सह कर्मचारी यांनी सहकार्य केले. झरी खदान येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आ. अमर राजूरकर, माजी सभापती किशोर स्वामी यांनी शिवाजी नगर सार्वजनिक गणेश मंडळ मुर्ती विसर्जन साठी आले होते.