Public Ganesha Mandal idol : नांदेड शहर व सिडको भागातील सार्वजनिक गणेश मंडळ मुर्ती विसर्जन शांततेत -NNL
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ व ग्रामीण भागातील श्री गणेश मूर्ती विसर्जन झरी खदान येथे १७ ते १८सप्टेंबर चौवीस तास चाल्लेया विसर्जन सोहळ्यात जवळपास अनेक मुर्ती क्रेनचा सहाय्याने व जिवरक्षक दलाच्या सहकार्याने मोठे २१७ व लहान मुर्ती सहा हजार विसर्जन करण्यात आल्या यावेळी मनपा आयुक्त डॉ महेश कुमार ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व मनपा, महसूल, पोलीस अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळ यांनी बसविलेल्या श्री गणेश मुर्ती गोदावरी नदीत विसर्जन न करण्यात झरी खदान येथे विसर्जन करण्यात येणार असल्याचे आवाहन केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी श्री विसर्जन गणपती मुर्ती झरी खदान येथे मनपाच्या वतीने करण्यात आले होते,यावेळी या ठिकाणी आयुक्त डॉ.महेश ...
