उस्माननगर, माणिक भिसे| माहिती आणि प्रसारण मंत्रालय,केंद्रीय संचार ब्यूरो,नांदेड आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, तसेच जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि ७ व ८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे भारतीय नवीन फौजदारी कायदे २०२४ या विषयी मल्टी मीडिया चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्धघाटन नांदेड जिल्हाधिकारी मा.अभिजित राउत ,पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे व जिल्हा न्यायधीश एस.एस.कोसमकर यांच्या हस्ते करण्यात आले .


प्रास्ताविक मा.माधव जायभये यांनी केले , तर सूत्रंचालन सुमित दोडल यांनी केले. उद्घाघाटनानंतर गितमोह सांस्कृतिक कलामंच शिराढोण या कला मंचचे शाहीर नालंदा सांगवीकर,बापूराव जमदाडे यांनी महाराष्ट्र गीतने सुरुवात केली. नंतर जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व न्यायाधीश यांनी भारतीय नवीन फौजदारी कायदे विषयी मार्गदर्शन केले नंतर कलमांच्या कलाकारांनी पथनाट्य सादरीकरण केले यात कलावंत डॉ.मनेश खंदारे,विजय गाजभरे, नालंदा सांगवीकर , गौतम सांगवीकर,प्रवीण सोनकांबळे,संजय कांबळे,चंद्रकांत तोरणे,सुभाष जोगदंड,माणिकचंद थोरात व नंदुलाल मोरे आदी कलावंतांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाला विधी महाविद्यालयाचे प्रा.विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शिराढोण येथील गितमोह सांस्कृतिक कलामंचाच्या सादरीकरणाचे कौतुक केले.




