नांदेड। सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करून मुख्य पुतळ्यापासून पासून भव्य मोर्चा समाज कल्याण कार्यालयावर काढण्यात आला.
जोरदार गगनभेदी घोषणाबाजी करीत मोर्चाची सुरवात करण्यात आली.मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करून समाज कल्याण मंत्री या नात्याने फसवणूक झालेल्या पीआरओ ना न्याय द्यावा व बहुतांश पीडित दलित असल्यामुळे आरोपी सुतारेकडे भरलेली रक्कम समाज कल्याण विभागाने विशेष तरतूद करून आर्थिक मदत करावी.
छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आमदार खासदार यांना सोबत घेऊन आरोपी सुतारे याने सुशिक्षित बेरोजगारां मार्फत लाखो रुपये जमा करून पोबारा केला व पीआरओना अडचणीत आणले आहे. म्हणून संबंधित आमदार खासदारांना सहआरोपी करण्यात यावे. आरोपी व त्याच्या दोषीं नातेवाईकांची संपत्ती जप्त करावी वत्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावे.
महाराष्ट्र राज्य अन्नधान्य सेवा केंद्रा मार्फत शेकडो करोड रुपयांची फसवणूक करून आरोपी सुतारे हा अनेक लोकप्रतिनिधी यांना घेऊन मेळावे घेऊन विविध योजनाचे आमिष दाखवून फसवणूक करीत होता आणि त्यास ज्यांनी प्रोत्साहन दिले त्यांना सहआरोपी करा. बहुतांश पीआरओ हे दलित व मागासवर्गीय असल्यामुळे समाज कल्याण विभागाने हस्तक्षेप करून विशेष निधीची तरतूद करून पीआरओ यांनी सुतारेला दिलेली रक्कम परत करून समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून आर्थिक मदत करण्यात यावी आदी मागण्या मोर्चाच्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
पीआरओ यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सीटू संघटनेच्या नेतृत्वात दि.३० सप्टेंबर पासून सामूहिक आमरण उपोषण सुरु केले आहे त्या उपोषणाची दखल समाज कल्याण मंत्री तथा मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी घेऊन दलितांना व मागासवर्गीयांना न्याय द्यावा अशी विनंती मोर्चेकऱ्यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे मार्फत सरकार कडे केली आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सीटू चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले.
यावेळीकॉ. उज्वला पडलवार,कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.शोभाबाई गिरबीडे,कॉ.संभाजी सावते,कॉ. सुभाष लोणे, कॉ. बालाजी इंगोले, लता गायकवाड, हणमंत सांगळे, प्रवीण वैद्य,कॉ.पंढरी बरुडे, कॉ.जयराज गायकवाड,कॉ.नवनाथ सावंत, कॉ.चंद्रकांत फुगारे, ज्योती सरतापे,कॉ.वर्षा कांबळे, कॉ.क्षमा वाघमारे, कॉ. कोमल भोकरे,नागोराव निवडंगे,रंजना सोनकांबळे, उज्वला वाघमारे,कॉ. कोमल भोकरे,हनुमंत सांगळे, कॉ. श्याम सरोदे,कॉ. पंढरी बरुडे, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. मारोती केंद्रे आदींनी नेतृत्व केले. जोपर्यंत मागण्या सुटणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहिल असे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी सांगितले आहे. मोर्चाची दखल सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांनी घेतली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र काढून माहिती दिली आहे. त्या पत्राची प्रत कॉ. गंगाधर गायकवाड यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.