किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील जि.प.केंद्रीय प्रा.शाळा जलधारा येथे दिनांक 28 रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला यावेळी पुढील मान्यवरांच्या उपस्थितीत या मेळाव्यास सुरुवात झाली.
याप्रसंगी डी.वाय.एस.पी.मुबंई उत्तमराव देवरावजी पाचपुते , शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, केंद्रप्रमुख अशोक हामदे, सरपंच सौ.वैशालीताई अनिल पाचपुते ,उपसरपंच, सौ.सरस्वताबाई शेषेराव शिरडे तंटा मुक्ती अध्यक्ष मुकिंदराव पाचपुते , माधव खंदारे शा.व्य.स.अध्यक्ष शिवाजी मारोती झिंगरे,माजी अध्यक्ष रामकिशन ढोले,सदस्य जनार्धन कावळे साहेब अहमद शेख , भगवान वाघमारे मुख्याध्यापक किशोर कावळे,शिक्षकवृंद व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन संपन्न झाला.
इयत्ता पहिलीत दाखल विद्यार्थ्यांची गावातील मुख्य रस्त्याने ट्रॅक्टर मधून डीजेच्या तालावर, फटाक्यांच्या आतिषबाजीत व लेझीम पथकाच्या नृत्याने मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. मिवणुक पाहून गावकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.तद्नंतर विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, आवड निर्माण व्हावी व तसेच पालकांनी विद्यार्थ्यांची घरी कशी तयारी करुन घ्यावी या बद्दल शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड व केंद्र प्रमुख अशोक हामदे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
शाळापूर्व तयारी मेळावा यशस्वितेसाठी स.शि.गर्जे, स.शि. केंद्रे सर स.शि.पाटील सर सौ.ढाकरे मॅडम .जाधव सर , पाचपुते सर, गुळवे सर , अंबालकर सर , मिरासे सर यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.