लोहा| निखळ राजकारण करणारे फार कमी नेते असतात. विरोध निवडणूकीपुरता तात्विक मानतात. राजकीय टोकाचा विरोध दैनंदिन जीवनात अडसर होऊ नये. याची अनेक नेते काळजी घेत असतात. जिल्ह्यात असे मोजके राजकीय नेते आहेत. मन्याङ गोदा भूमीत चिखलीकर-भोसीकर ही जोडगोळीने गेली ३५-४० वर्ष जिल्ह्याचे राजकारण गाजविले. दुर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिले पण कधी एकत्रित तर कधी अंतर्विरोधी होते. त्यानंतर एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांचे मे महिण्यात निधन झाले. त्याच्या पश्चात मित्राच्या कुटुंबियांच्या मदतीला प्रतापराव धावले . हरिहररावांचे विरंजीव शिवकुमार यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिननिवड झाली.हा क्षण भोसीकर कुटुंबासाठी एका डोळ्यात दुःख अन दुसऱ्यात आनंद होता. यासाठी प्रतापरांवाचा पुढाकार होता.चिरंजीव शिवकुमार यांची जिल्हा बँकेच्या राजकारणात इन्ट्री करून दिली. हीच श्रद्धांजली मित्रास त्यांनी अर्पण केलीयावरून प्रतापरावांचे राजकीय प्रगल्भता व राजकीय उच्ची किती’ मोठी आहे हे जिल्ह्याने अनुभवले.


जिल्हाच्या राजकारात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व आ. प्रतापराव पाटील यांच्याच भोवती गेली. दीड दशकाहून अधिक काळ राजकारण फिरते आहे. मन्याड – गोदा भूमी काठी’ हरिहरराव भोसीकर व प्रतापराव यांनी दिर्घकाळ यांनी जिल्हा परिषद गाजविली. त्या काळातही कधी एकत्रतर कधी विरोधी गटात ते होते. सहकारात सुध्दा काही निवडणूकीत विरोधक राहिले. दोन्ही नेत्यांनी २००४ मध्ये एकमेका विरुद्ध विधानसभा लढविली.सार्वजनिक जीवनात विरोधक असूनही त्यांनी राजकारणाच्या विरोधाची भिंत पक्की उभी केली नाही. पण प्रसंगानुरुप मैत्री राहिली पण निवडणूक आली की, भोसीकर यांनी अशोकराव तसेच अजितदादा याच्या सोबत असायचे.माजी मंत्री .कुंटुरकर, माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, माजी मंत्री किन्हाळकर गोरठेकर, टाकळीकर, याच्या सोबत ते होते. माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. रोहिदास चव्हाण, यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्या सोबत त्याचे स्नेहाचे संबंध होते.



प्रतापराव- हरिहरराव याच्यात विरोध होता पण दोन्ही तालुक्यात जुने जाणत्या नेत्यांनी आजच्या सारख्या हवेत असणाऱ्या नेत्यासारखे ” असभ्य भाषा ” कधीच वापरली नाही. मोठे भोसीकर -चिखलीकर -भोसीकर – धोंडगे यांच्यात भाषेचा सुसंकृत पणा होता आहे. हरिहरराव हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृषी, बांधकाम, शिक्षण सभापती होते. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असताना त्याचे मे महिन्याच्य अखेर निधन झाले. ते २००४ पूर्वी’ बँकेवर कंधार मधुन विजयी झाले तेव्हा प्रतापरावांच्या इश्वर चिट्टी’ निघाली नव्हती. पण निवडणूक संपली की, या दोघांनी निखळ मनाने राजकारण केले. प्रतापराव धडाडीने पुढे आले अन् मितभाषी हरिहरराव आजारामुळे त्रस्त झालें.



यापूर्वी जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्या नंतर त्याचे चिरंजीव खासदार रविंद चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली . हरिहरराव निधनामुळे जिल्हा बँकेचे संचालक पद रिक्त झाले त्यांच्या जागी चिरंजीव शिवकुमार यांना घ्यावे असा प्रस्ताव प्रतापरावांनी ठेवला आणि बिनविरोध संचालक व्हावे म्हणून त्यांनी सर्व सहमती घडवून आणली. राजकारणात विरोधकांना संधी देण्यासाठी मोठे मन् लागते. विरोधक असलेले मित्र भोसीकर गेल्यानंतर त्यांच्या कुदूंबीयांच्या मदतील प्रतापराव धावले शिवकुमार भोसीकर यांची जिल्हा बँकेच्या राजकारणात इन्ट्री झाली.वडीलाच्य पश्चात त्यांना मिळालेली संधी “राजकीय वारसा पुढे नेणारी आहे. त्यांच्या आई भाऊ पत्नी व कुटुंबियांचे बाबांच्या आठवणीने डोळे पाणावले. तर दुसरीकडे शिवकुमार यांना संचालक करत प्रतापरावांच्या राजकीय निखळ राजकारणाची “उंची”, जिल्ह्याने अनुभवली.सर्व पक्षीय नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे.



