लोहा| सामाजिक उपक्रम राबविताना निवडणूकीतील जय – पराजय यांचा कोणताही परिणाम होऊ न देता स्वतःहुन स्वीकारलेली सामाजिक बांधीलकी जोपासत प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी वटपौर्णिमे निमित्ताने लोह्यात वट वृक्ष व पुष्पफुलांचे रोपटे वाटप केले. गेल्या दहा वर्षां पासून हा उपक्रम त्या राबवित असतात.


देऊळगल्ली येथे वटपौर्णिमा निमित्ताने आयोजित वटवृक्ष व फुलांचे रोपटे वाटप प्रतिभाताई पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करम्यात आले यावेळी प्राणिताताई देवरे चिखलीकर माजी नगरसेविका कल्पनाताई मुकदम -चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्या वाले नगरसेविका शोभाताई बगडे, डॉ सौ घंटे यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


यावेळी प्राणिताताई यांनी मार्गदर्शन केले व दहा वर्षा पासून राबविण्यात येत असलेल्या वृक्षांची झाडे भेट देण्याचा उपक्रम पर्यावरण पूरक आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षा पासून आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम घेतो वृक्ष लागवड व संगोपन ही काळाची गरज आज असे त्यांनी सांगितले व महिलांना वट वृक्ष व फुलांचे रोपटे भेट दिले.




