नांदेड। येथील आनंदनगर भागात मागील १२ वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार ब्रँड असलेल्या प्रा.राम वानखेडे यांच्या वानखेडे कोचिंग क्लासेसचा दत्तक विद्यार्थी असलेल्या प्रणव परमेश्वर सुके याने नीट २०२४ च्या निकालात अनुसूचित जमाती या प्रर्वगातून संपूर्ण देशभरातून १४६ वा रँक प्राप्त करत नुकत्याच जाहीर झालेल्या मेडीकल प्रवेशासाठीच्या यादीत एम्स् रायपूर येथे प्रवेश प्राप्त केला आहे.
प्रणव सुके च्या निवडीबद्दल अधिक माहीती देतांना प्रा. राम वानखेडे यांनी सांगितले की, प्रणव हा ईयत्ता ६ वी पासून आपल्या वानखेडे कोचिंग क्लासेस व हॉस्टेल चा विद्यार्थी असून तो तेलंगवाडी ता.कंधार जि.नांदेड येथील मूळ रहीवाशी आहे त्याचे वडील परमेश्वर सुके हे अल्पभूधारक शेतकरी होते परंतु दुर्देवाने ८ वर्षापूर्वी त्यांचे सर्पदंशाने निधन झाले होते त्यानंतर एंकदरीत परिस्थिती लक्षात घेता आम्ही आमच्या क्लासेसच्या वतीने प्रणव सुकेच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलून त्यास ६ वी ते १० पर्यतचे क्लासेस व हॉस्टेल सुविधेसह शैक्षणिक खर्चाची व्यवस्था केली.
प्रणव सुके हा विद्यार्थी अंत्यत मेहनती व हुशार असल्यामुळे २०२२ साली १० वी बोर्ड परिक्षेत तो महात्मा फुले हायस्कूल बाबानगर येथून ९८.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाला होता पुढे त्याच्या गुणवत्तेनुसार त्याने विज्ञान शाखेची निवड करत मेडीकल प्रवेशासाठीचा महाब्रँड असलेल्या आयआयबी ईन्स्टिट्यूट येथे ११ वी १२ वी आणि नीट साठी मार्गदर्शन घेतले त्यात आयआयबीच्या वतीनेही त्याला खूप मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे अशी अधिक माहीती प्रा. राम वानखेडे यांनी यावेळी दिली.
शेवटी ते म्हणाले की, माझ्या क्लासेस मधून एम्स् ला विद्यार्थी पाठविण्याचे स्वप्न यानिमित्ताने साकार झाले आहे आणि माझ्या वानखेडे कोचिंग क्लासेस व हॉस्टेल चा प्रणव परमेश्वर सुक्रे याची एम्स् रायपूर येथे निवड झाली आहे ही वानखेडे कोचिंग क्लासेससाठी अभिमानाची बाब आहे.
वानखेडे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहानासाठी योगदान..! वानखेडे कोचिंग क्लासेस व निवासी हॉस्टेल येथे शिक्षणासाठी येणारा विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून येतो, त्यामुळे पालकांपासून त्यांचा सहवास हा आमच्याशी जास्त येतो मग एखाद्या जागरुक पालकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांत सरस यशाकरीता स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी मागील पाच वर्षापासून क्लासेस मधून ईयत्ता दहावीच्या वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस पॅशन प्रो ही मोटारसायकल बक्षिस दिल्या जाते तर व्दितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांस लॅपटॉप प्रदान करण्यात येतो त्याबरोबर तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रोत्साहनपर बक्षिस देऊन सन्मान केला जातो.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारीक ज्ञानासाठी प्रयत्न
येथे येणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातील असल्या कारणाने त्याला शहरीकरणाचा जवळून संपर्क यावा या हेतूने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषणे,बाजार भेट,विविध ठिकाणांना भेटी देणाऱ्या सहली,व्याखाने आदींचे आयोजन सातत्याने करण्यात येते जेणेकरून यातून विद्यार्थी घडावा व त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हा प्रमुख हेतू त्यामागे असतो असे प्रा.राम वानखेडे नमूद करतात.