प्रतिकूल परिस्थितीतून प्रणव परमेश्वर सुके एम्स् रायपूरसाठी पात्र -NNL
नांदेड। येथील आनंदनगर भागात मागील १२ वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार ब्रँड असलेल्या प्रा.राम वानखेडे यांच्या वानखेडे कोचिंग क्लासेसचा दत्तक विद्यार्थी असलेल्या प्रणव परमेश्वर सुके याने नीट २०२४ च्या निकालात अनुसूचित जमाती या प्रर्वगातून संपूर्ण देशभरातून १४६ वा रँक प्राप्त करत नुकत्याच जाहीर झालेल्या मेडीकल प्रवेशासाठीच्या यादीत एम्स् रायपूर येथे प्रवेश प्राप्त केला आहे.
प्रणव सुके च्या निवडीबद्दल अधिक माहीती देतांना प्रा. राम वानखेडे यांनी सांगितले की, प्रणव हा ईयत्ता ६ वी पासून आपल्या वानखेडे कोचिंग क्लासेस व हॉस्टेल चा विद्यार्थी असून तो तेलंगवाडी ता.कंधार जि.नांदेड येथील मूळ रहीवाशी आहे त्याचे वडील परमेश्वर सुके हे अल्पभूधारक शेतकरी होते परंतु दुर्देवाने ८ वर्षापूर्वी त्यांचे सर्पदंशाने निधन झाले होते त्यानंतर एंकदरीत परिस्थिती लक्षात घेता आम्ही आमच्या क्लासेसच्या वतीने प्र...
