नांदेड| नांदेड ग्रामीण, लिंबगाव व कुंटर पोलीसांनी अवैध रेती साठ्यावर छापे मारुन नदीपात्रात 02 इंजीन व 07 रेती काढण्याचे तराफे नष्ट करण्यात आले. आणि 20 ब्रास रेती असा एकूण 3,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध रेतीची उपसा व साठवणूक करणाऱ्यावर कारवाई कण्याचे दिलेल्या आदेशाचे पालन करून नांदेड ग्रामीण, लिंबगाव व कुंटर पोलीसांनी अवैध रेती साठ्यावर छापे मारुन अवैध रेती सह इंजीन व तराफे जप्त करून नष्ठ केले आहे.


नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सपोनि.विशाल भोसले, पो स्टे कुंदुर सपोनि पंढरी बोधनकर, पो स्टे लिबगाव यांनी व त्यांच्या टिमने दिनांक 24 ते 25/06/2025 रोजी पेट्रोलींग दरम्यान गोपनीय माहीतीवरुन आपआपले पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकून गोदावरी नदीपात्रात इंजीन लावुन, तराफे वापरुन नदीतील विनापरवाना अवैध रेती उत्खनन व साथ करणाऱ्यावर कार्यवाही केली आहे.


यात विष्णुपुरी, असर्जन, राहेर व थुगाब या ठिकाणी कारवाई केली असून, नदीपात्रात 02 इंजीन व 07 रेती काढण्याचे तराफे मिळून आले व 20 ब्रास रेती असा एकूण 3,00,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, पो स्टे कुटुंर येथे अवैध रेती उत्खनन करणारे अज्ञात लोकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्हयातील मुद्देमाल जप्त करुन जमा करण्यात आला असून, तराफे जागीच जाळुन नष्ट करण्यात आले आहेत. सदरची कार्यवाही करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगीरीचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.


पो स्टे नांदेड ग्रामीण- 02 इंजीन किमती 200000/- रुपयाचे व 08 ब्रास रेती किंमती 40,000/- रुपये व पाच तराफे असा एकुण 2,40,000/- रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला. tar पो स्टे कुंटुर- 12 ब्रास रेती 60,000/- रु चा मुद्देमाल आणि पो स्टे लिंबगाव- दोन तराफे जाळुन नष्ट karat एकुण 3,00,000/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली ओमकांत चिचोलकर, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, सपोनि विशाल भोसले, पो स्टे कुंदुर, सपोनि पंढरी बोधनकर, पो स्टे लिबगाव सपोउपनि, माधव गवळी, विश्वंभर निकम, पोह/रमन बैनवार, हंबर्डे, काजी, पोना डफडे, पोको इंगळे, पोको सिध्देश्वर कवठेकर, वाराळे, नेमणूक पोलीस स्टेशन नांदेड प्रामीण यांनी केली.


