किनवट (प्रतिनिधी) तालुक्यातील माळकोल्हारी येथील रहिवासी कै. किरण मारोती खंदारे (वय २८) यांचे आज शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता किनवट येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.


कै. किरण खंदारे हे गेल्या पाच वर्षांपासून दारूबंदी विभागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते हदगाव येथे आपली सेवा बजावत होते. कर्तव्यनिष्ठ, मनमिळावू व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता मौजे माळकोल्हारी, ता. किनवट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.


शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर त्यांनी दारूबंदी विभागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊन उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


