नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या 39 गावात शेतकरी राजाने जल्लोषात ढोलताशांच्या गजरात व गावातील हनुमान मंदिरात प्रदक्षिणा मारून अनेक गावांत सामुदायिक मंगलाष्टके म्हणुन सामुदायिक लग्न सोहळा,आरती करून साजरा करण्यात आला यावेळी गावातील ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,प्रतिष्ठित नागरीक, पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष, यांच्या सह महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैलपोळा सणाच्या निमित्ताने 22 ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतअसलेल्या तुप्पा, जवाहरनगर, भायेगाव, वाजेगाव, कांकाडी, नागापूर,राहेगाव,वांगी,पुणेगाव, वाडीपुयड, वसरणी, असरजन,वाघाळा, असदवन, पिंपळगाव ,यासह जवळपास 39 गावात विधीवत पुजन करून सामुदायिक लग्न सोहळा,महाआरती ने बैलपोळा सण ऊत्साहात साजरा करण्यात आला.



नांदेड तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक चळवळीत अग्रेसर असलेल्या बाभुळगाव येथे सामुदायिक लग्न सोहळा सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला,यावेळी महाआरती नंतर मानकरी मारोती मस्के यांच्या हस्ते तोरण तोडण्यात आले, प्रारंभी गावातील शेतकरी बांधवानी आपल्या सर्जा राजा यांच्यी सजावट करून गावातील हनुमान मंदिरात येथे आणुन प्रदर्शना घालून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सामुदायिक लग्न सोहळा संपन्न झाला.


गावातील महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी सरपंच पुंडलिक मस्के, तंटामुक्त अध्यक्ष सूर्यभान पाटील मोरे,प्रभाकर पाटील मोरे,अशोक मोरे, काळेशार मस्के , बालाजी पाटील मस्के,सुर्यभान मोरे,पोलीस पाटील संतोष मोरे, मधुकर मस्के ,ग्रामपंचायत सदस्य ,गावातील प्रतिष्ठीत नागरीक, मोठया संख्येने उपस्थित होते.
भायेगाव येथे ही ऊत्त्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला.

यावेळी तोरण तोडण्याचा मान शामराव पाटील खोसडे मुकदम यांच्या सह गावातील विस शेतकरी बांधवांचा बैलजोडी हनुमान मंदिर येथे विधीवत पूजन करून पशुधन असलेल्या मालकांनी आपल्या निवासस्थाना बाहेर लग्न लावणु विधीवत पूजन केले,यावेळी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर,अशोक पाटील कोचार,उपसरपंच बालाजी कोल्हे, विठ्ठल पाटील खोसडे,पोलीस पाटील सुमन खोसडे यांच्या सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवाहरनगर तुप्पा येथील हनुमान मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता मानकरी वामन कदम यांच्या हस्ते तोरण तोडण्यात आले यावेळी बबनराव कदम,दता पाटील कदम यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सामुदायिक लग्न सोहळा,आरती ऩंतर ढोलताशांच्या गजरात पशुधन मालकांनी गावातुन भव्य मिरवणूक काढुन निवासस्थानी विधीवत पूजन केले.
राहेगाव येथे बैलपोळा सणानिमित्त गावातील हनुमान मंदिर येथे उत्साहात पशुधन मालकांनी ढोलताशांच्या गजरात विधीवत पूजन केले यावेळी रामदास इंगळे ,आनंदा पाटील भोगं ,पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शना खाली अधिकारी ,पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या सह गावनिहाय बंदोबस्त लावण्यात आला होता दुपारी 1ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऊत्त्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सर्व गावातील पोलीस पाटील यांना दिलेल्या पुर्व सुचना व गावातील पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सुचना मुळे अंत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पोळा सण उत्साहात साजरा झाला.


