HomeनांदेडPlanting of trees : झाडे लावा झाडे जगवा जनजागृती मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण सुरुवात

Planting of trees : झाडे लावा झाडे जगवा जनजागृती मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण सुरुवात

नांदेड| देशाचे माजी गृहमंत्री, जलनायक कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून झाडे लावा झाडे जगवा जनजागृती मोहीम व वृक्ष लागवड कार्यक्रम नाईक नगर मैदान येथुन सुरू करण्यात आला.

वृक्ष लागवड ही काळाची गरज असून अलीकडच्या काळात वाढत असलेलं तापमान व अनियमित झालेला पावसाळा व ऋतुचक्र लक्षात घेता वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन हे काळाची गरज असून वृक्षरोपणा शिवाय पर्याय नाही. त्यामुळे देशाचे माजी गृहमंत्री जननायक कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीचा उचित्य साधून झाडे लावा झाडे जगवा जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.

मोहीम संपुर्ण शहरात राबवली जाणार आहे.जवळपास 11000 वृक्ष लागवडीचे उद्देश समोर ठेवले आहे. त्या मोहिमेचा सुरुवात म्हणून नाईक नगर मैदान येथे वृक्ष लागवड करून वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला आहे.

यावेळी आयोजक तथा माजी नगरसेवक डॉ. विश्वास कदम, सहआयोजक कृष्णा कदम, व्यंकटराव मोकले, माजी नगरसेवक देयानंद वाघमारे, उद्योजक श्याम जाधव, प्रकाश चितळकर, रेल्वे बोर्ड सदस्य दर्डा, डॉ.हमद, आदित्य शिरफुले, रविंद्रसिंघ बैस, प्रशांत हेमके, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, प्रा. जानते, गबाळे, सामुदरे, इंजि. तोटावाड, रनविजय कदम, गुंडले आदी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments