क्राईमनांदेड

Sand Thift arrested ; वाळू तस्करांनी पळवून नेलेला ट्रॅक्टर केला जप्त ; एका आरोपीसही केली अटक

श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी दिघडी कुत्तेमार् येथून ते पैनगंगा नदी पलीकडील विदर्भात असलेल्या फुलसावंगी इथपर्यंत पोलिसांनी पाठलाग करूनही पळून जाण्यात यशस्वी ठरलेला ट्रॅक्टर आणि चालकास पोलिसांनी आज फुलसावंगी येथे जाऊन जप्त करत ट्रॅक्टरच्या चालकाला अटक केल्याची घटना दि 23 रोजी सकाळी नऊ वाजता घडल्याने पोलिसांच्या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे

दिनांक 19 रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस निरीक्षक गणेश कराड पोलीस उपनिरीक्षक बालसिंग ब्राह्मण पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईंनवाड यांचे सह पोलिसांनी नदीपात्रातून वाळू भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अडविण्याचा प्रयत्न केला होता परंतु ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरला परत पैनगंगा नदीतून फुलसावंगी येथे पळवून नेले होते त्यादरम्यान पोलिसांनी पाठलाग करत असताना पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गोळीबार करण्याच्या उद्देशाने पिस्तूल ही बाहेर काढले होते परंतु गोळीबार होण्याचे आधीच चालकाने ट्रॅक्टर फुलसावंगी गावात पळवून नेला होता.

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तपासचक्र फिरवून फुलसावंगी गावातून ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि त्यास माहूरच्या न्यायालयासमोर हजर केले असता चालकास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विदर्भातील काही गावातील वाळू तस्कर स्वतःला डॉन समजून देसी कट्टे सोबत ठेवून वाळू तस्करी करत असल्याची माहिती मिळत असून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे समोर या वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळण्याचे मोठे आव्हान असून माहूरचे तहसील कार्यालय मात्र हिंगणी दींगडी रुई हडसणी वांनोळा कुपटी मोहपूर् सिंदगी या परिसरातील वाळू तस्करावर मेहरबान असल्याने महसूल पथकाकडून भीतीपोटी या ठिकाणी कारवाया होत नसल्याने पोलिसांनी आपली करडी नजर या भागात वळविल्याने भविष्यात मोठ्या जबरी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button