हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील रहिवाशी, सुप्रसिद्ध छायाचित्रकार चंद्रमणी चोखाजी वाठोरे यांचे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान दि. १ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ४९ वर्षांचे होते.


त्यांच्या आकस्मिक निधनामुळे वाठोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सरसम (बु.) परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात ते परिचित होते. त्यांच्या साधेपणामुळे व कामावरील निष्ठेमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.

त्यांचा पार्थीवावर दि. २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मौजे सरसम (बु.), ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार आहे. संघपाल वाठोरे, नारायण वाठोरे व सहशिक्षिका बेबीनंदा सोनवणे यांचे ते भाऊ होत. तसेच डॉ. संदेश वाठोरे, हायकोर्ट क्लार्क सुमेध वाठोरे, पत्रकार विजय वाठोरे, राजरतन वाठोरे व संघप्रिया कवडे यांचे ते चुलते होत.


ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. 🙏


