Friday, June 26

Tag: from Sarsam has passed away

Paased away : पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे दुःखद निधन

Paased away : पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे दुःखद निधन

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर/नांदेड | पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे आजारपणामुळे आज सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पद्मशाली समाजासह नांदेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्व. परमेश्वर तुकाराम मादसवार हे समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व असून त्यांनी सामाजिक कार्यातून अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने समाजाने एक अनुभवी व मार्गदर्शक व्यक्ती गमावली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता बोरगडी रोड, वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्व. परमेश्वर तुकाराम मादसवार यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तेष्ट व मोठा सामाजिक परिवार आहे. ते पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष संजय परमेश्वर मादसवार यांचे वडील होते.🙏 त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना नांदेड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे ॐ शांती....
Nidhan : सरसम येथील छायाचित्रकार चंद्रमणी वाठोरे यांचे दुःखद निधन

Nidhan : सरसम येथील छायाचित्रकार चंद्रमणी वाठोरे यांचे दुःखद निधन

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील रहिवाशी, सुप्रसिद्ध छायाचित्रकार चंद्रमणी चोखाजी वाठोरे यांचे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान दि. १ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे वाठोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सरसम (बु.) परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात ते परिचित होते. त्यांच्या साधेपणामुळे व कामावरील निष्ठेमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांचा पार्थीवावर दि. २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मौजे सरसम (बु.), ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार आहे. संघपाल वाठोरे, नारायण वाठोरे व सहशिक्षिका बेबीनंदा सोनवणे यांचे ते भाऊ हो...
error: Content is protected !!