नांदेड| कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभाग व पुणे येथील आयुका (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कंटेम्पररी इश्यूज इन अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिकल-२०२४’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन दि. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते.


या कार्यशाळेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलामधून ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये विशाल काळे, शंकर नरवाडे, नारायण कापुरे, अविनाश काळे, अक्षय कटारे, शेजल नादरे, निलीशा जकाते, मुस्कान शेख व नहानु शेख यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला होता. या कार्यशाळेसाठी देशातील विविध भागातील संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांना विशेष तज्ञ संशोधक प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे.


या कार्यशाळेत सहभाग घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. अशोक कुंभारखाणे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. राजाराम माने, डॉ. अरविंद सरोदे, डॉ. काशिनाथ बोगले यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
