उस्माननगर l ऑगस्ट अखेरीस दि. २७ २८, २९ , ३० रोजी झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण ( पंचनामे ) करण्यासाठी महसूल प्रशासनाची टिम शेतकऱ्यांच्या शेतावर,बांधावर जाऊन करत आहेत.


उस्माननगर मंडळात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तीन दिवस ढगफुटी सदृश्य परिस्थितीत झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदीकाठावरील शेतपिके पुराच्या पाण्यात अक्षरशा खरडून गेली आणि हातातोंडाशी आलेला घास नाहीसा झाला सोयाबीन,मुग , ऊस, कापूस , हाळद , तुर , भाजी पाला , अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी बैल , म्हैस , गाय , शेती उपयोगी साहित्य , पाण्यात वाहुन गेले. तर नुकसान झाले होते.



ही परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्री , आमदार , जिल्हाधिकारी , सिईओ , तहसीलदार , मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार तलाठी हिवंत , कृषी सहायक अधिकारी डफडे , ग्रामसेविका सौ.शिंदे , पोलिस पाटील मोरे , महसूल सेवक करंडे , आदी कर्मचारी यांनी परिसरातील नुकसानीची पाहणी करुन नोंद घेताना शेतातील बांधावर जाऊन घेत आहेत. हाळद , सोयाबीन, मूग, कापूस तुर , पिकांचे उडीद, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दाखवत आम्हाला शासकीय अनुदान लवकरात लवकर मिळवून द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी यांच्या कडे करीत आहेत .


महसूल प्रशासनातील अधिकारी गुडघाभर पाण्यात , काटे ,चिखल, तुडवित थेट शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करीत आहेत.या भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी महसुल अधिकारी परिश्रम घेत आहेत.



