नांदेड। मोदी सरकारने नांदेड येथील हनुमान गड भागातील टेलिफोन डिपार्टमेंटची भूखंड विक्री प्रक्रिया ताबडतोब थांबावा अन्यथा टेलिफोन भावनावर शिवसेनेचा मशाल मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी दूरसंचार विभागाचे जनरल मॅनेजर यांना दिला.
मोदी सरकारच्या धोरणानुसार केंद्र शासनाने आतापर्यंत एअर इंडिया. भारत पेट्रोलियम यासारख्या राष्ट्रीय संपत्तीचे कंपन्या या अगोदरच विक्रीला काढल्या. आता तर सर्वसामान्य जनतेशी निगडित असलेले दूरसंचार विभागाची मालमत्ता ठिकठिकाणी विक्री करत आहेत काही ठिकाणी प्रस्तावित आहे.
नांदेड उत्तर मतदारसंघातील हनुमान गड भागात सर्वे नंबर 34 मधील 4 एकर भूखंड श्रीखंड करून विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून तो प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात तात्काळ रद्द करून त्या भूखंडावर क्रीडांगण. बगीचा. ओपन डोर मैदान विकसित करा अन्यथा नांदेड टेलिफोन भावनावर शिवसेनेचा मशाल मोर्चा करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी दूरसंचार विभागाचे जनरल मॅनेजर यांना दिला.