उस्माननगर, माणिक भिसे l गणेशोत्सव बंदोबस्त अनुषंगाने उस्माननगर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ६२ खेडे ,तांडा वाडी गावाता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उस्माननगर येथील प्रमुख मार्गाने पथसंचलन काढण्यात आले होते.


जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी शांतता कमिटीच्या बैठका घेवून लोकांना तसेच प्रत्येक गणेश मंडळांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सव बंदोबस्त कामी नांदेड शहर, ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच बाहेरून सुध्दा मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी अंमलदार यांना नेमण्यात आले आहे. ६ सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जन होणार असून श्रीगणेश विसर्जन शांततेत पार पाडावे या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली उस्माननगर येथील “पोलीस स्टेशन च्या वतीने गावातील प्रमुख मार्गावर पथसंचलन घेण्यात आले.


सदर पथसंचलनामध्ये सपोनि संजय निलपत्रेवार, सपोउपनि गाडेकर, सपोउनि सुर्यवंशी, सपोउनि सौ.लोपामुद्रा आनेराव -कुबडे, सपोउनि मुंडे , हाजेरी मेजर शिवपुजे , बिट जमदार सुशिल कुबडे , पोलीस अंमलदार , होमगार्ड , आरसीपी प्लाटून २, क्युआरटी प्लाटुन १, वज्र वाहन व दोन थार वाहनांसह सहभागी झाले. पोलीस स्टेशन अंतर्गत पथसंचलन घेण्यात आले . सपोनि संजय निलपत्रेवार यांनी भयमुक्त व डि.जे.मुक्त गणेशोत्सव साजरा करणे बाबत परिसरातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे.


उस्माननगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ६२ तांडे वाडी गावात ८९ श्री ची प्रतिष्ठापणा करण्यात आली असून यामध्ये ३८ गणेश मंडळ डिजे मुक्त मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे कळविले आहे


