उस्माननगर| उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्या मार्गाने देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एकास पकडून पोलीसांनी कारवाई केली आहे. उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक हे नव्याने रुजू होताच त्यांनी अवैध धंद्यांना आळा घालण्यास सुरूवात केली आहे.


गुरूवारी दि. १० एप्रिल रोजी उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्या मार्गाने देशी दारूची अवैध विक्री करणारा गोविंद दिगंबर कदम वय २४ वर्ष रा.चिखली ता.कंधार जि.नांदेड हा विना परवाना बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करण्याच्या उदेशाने स्वतःजवळ बाळगलेला ताब्यातून १३ हजार ४४० रूपये किंमतीची देशी दारू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल त्याची किंमत ९०,००० रू. वहातूक करीत असतांना पोलीसांना डोलारा पाटीजवळ मिळून आला.


त्यांच्याकडून देशी दारू व मोटारसायकलसह एकूण एक लाख ३ हजार ४४० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून फिर्यादी पो.काॅ.माधव भगवानराव पवार पोलीस स्टेशन उस्माननगर यांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात गु.र.न.६२ / २०२५ कलम ६५ ( ई ) म.पो कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोना चिंचोरे करित आहेत.
