नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत आयोजित जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धेत आपले नैपुण्य दाखविण्यासाठी गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून 1 ते 20 ऑगस्ट, 2024 दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वॉदो प्रशिक्षण केंद्र, नांदेडच्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील वाडी-तांड्यावरील शाळांनी, खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे व तायक्वॉदो प्रशिक्षण केंद्राचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा पंच बालाजी पाटील जोगदंड यांनी केले आहे.
ऑलम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या तसेच जगातील सर्वोच्य सैन्याच्या संरक्षण दलात प्रशिक्षण देण्यात येणारा तायक्वॉदो खेळ आहे. या खेळामुळे शहरासह ग्रामीण भागातील खेळाडू विद्यार्थ्यांना स्वशिस्त, शिष्टाचार, ध्यानसाधना, संमोहनशास्त्राची प्रचिती यावी व त्यांनी जिल्ह्याचे व राज्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर वृद्धिंगत करावे, म्हणून विविध शाळांमध्ये तसेच प्रशिक्षण केंद्र, अशोकनगर येथे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी मागील 23 वर्षात अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते जिल्ह्याला दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये शाळांच्या सोयीनुसार व प्रशिक्षण केंद्रात सायंकाळी पाच ते आठ वाजेदरम्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खेळांडूना 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामीण शालेय तायक्वांदो स्पर्धा व 17 ऑगस्ट रोजी मनपाअंतर्गत आयोजीत जिल्हास्तर तायक्वादो स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविता येणार आहे.
जिल्ह्यासह शहरातील शाळा महाविद्यालयातील खेळाडूंनी या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, डॉ. हंसराज वैद्य प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२०६७३३९४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असेही कळविले आहे.