नांदेड| सर्व ठाकूर-ठाकर आदिवासी बंधू-भगिनीनी समाज प्रबोधन मेळाव्यास उपस्थित राहण्याचे अदिम ठाकूर जमात मंडळ राज्य शाखेने केले आहे. आदिम ठाकूर जमात मंडळ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी (रविवारी) सकाळी ठीक 11.00ते5.00 यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व आदिवासी ठाकूर ठाकर बंधू भगिनींसाठी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये,ठाकूर ठाकर समाजा विषयी संपूर्ण माहित,ठाकूर-ठाकर जमातीचे प्रमाणपत्र मिळविणे, वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठीची माहिती सेवानिवृत्त बंधू-भगिनीचा सत्कार,नांदेड जिल्ह्यातील आदीम ठाकुर जमात मंडळाची नूतन कार्यकारणी निर्मिती करणे,समाज बंधू भगिनींना उपविभागीय अधिकाऱ्याने दिलेले बी फॉरमॅटमधील सर्टिफिकेट सी फॉरमॅटमध्ये आणा त्याशिवाय वैद्यता होणार नाही हे सहयुक्तच्या लेखी आदेशाला कोर्टात आव्हान देणे व बी फॉरमॅट मधील सर्टिफिकेटचीच पडताळणी करून घेण्यासाठी तयारी करणे या व अशा अनेक मुद्दे निकाली काढण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ठाकूर -ठाकूरआदिवासी बंधू-भगिनींनी या मेळाव्यास सहकुटुंब वेळेवर उपस्थित राहावे असे अदिम ठाकूर जमात मंडळ राज्यशाखेतर्फे जाहीर आवाहन करण्यात आले असून, सदरील मेळाव्या साई संस्थान कौठा नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाजसेवक सुभाष ठाकूर राज्याध्यक्ष जनार्दन ठाकूर राज्य नेते,सौ .नयनाताई निकम महिला आघाडी प्रमुख राज्य शाखा बालाजीराव शिंदे राज्य कार्याध्यक्ष,प्रल्हादराव शिंदे राज्य महासचिव,भगवानराव ठाकूर राज्यकोषाध्यक्ष,सतीश ठाकुर गायकवाड उपाध्यक्ष राजाराम ठाकूर, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी उपाध्यक्ष, तुकाराम पवार जेष्ठ मार्गदर्शक.गिरीश ठाकूर जेष्ठ मार्गदर्शक सुनील जाधव ज्येष्ठ मार्गदर्शक व सर्व राज्यकार्यकारणी सदस्य अदिम ठाकूर जमात मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.