नांदेडलाइफस्टाइल

Organization of organ donation awareness rally | शनिवारी अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन – NNL

नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे अवयवदान जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने 3 ऑगस्ट 2024 रोजी भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचे आयोजन समाजामध्ये अवयवदानाचे महत्त्व, प्रक्रिया आणि त्याचे फायदे याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे.

ही रॅली 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वा. सुरू होऊन महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. कॉर्नरपासून शहरातील विविध मार्गांवरून परत ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होईल. या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नांदेड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

अवयवदानामुळे अनेकजणांना नवीन जीवन मिळू शकते. एक अवयवदाता आपले हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि इतर अवयवदान करून अनेकजणांचे जीवन वाचवू शकतो. अवयवदान हे समाजाच्या हितासाठी केलेले एक उत्तमकार्य असून त्यामुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते. या रॅलीमध्ये अवयवदान प्रक्रियेवरील चित्रफलक, पोस्टर, माहितीपत्रके आणि घोषनांव्दारे अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

नांदेड शहरातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी सदरील रॅलीमध्ये मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button