हिमायतनगर| आज दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर येथे अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


ही रॅली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बुट्टे सर, तसेच नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव यांच्या निरीक्षणाखाली पार पडली.



या रॅलीमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. बुक्तरे सर, राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर चे मुख्याध्यापक दिक्कतवार सर, RKSK समुपदेशक सतीश भरांडे, NCD समुपदेशक दीपक इंगोले, तसेच विविध आरोग्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीद्वारे अंगदानासंदर्भात जनजागृती करण्यात आली. अंगदानाचे महत्त्व, गरज आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठीची भूमिका अधोरेखित करण्यात आली.


🔹 अंगदान – मृत्यूनंतरचे जीवनदान
🔹 “जगा आणि इतरांनाही जगवा” – या संकल्पनेला पूरक अशी ही मोहिम होती.



