नवीन नांदेड l गोदावरी नदीच्या पात्रात सतत होणाऱ्या नदी पात्रात झाली वाढ पाहता नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या वसरणी भागातील पंचवटी व शंकरनगर भागातील जवळपास शंभर नागरीकांना जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वसरणी येथे स्थांलारीत करण्यात आले असून जेवणासह झोपण्याची व्यवस्था केली आहे, उपायुक्त गाढवे क्षेत्रीय अधिकारी मिर्झा बेग,कर निरीक्षक शेख शादुला हे या भागात परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत, कर्तव्यदक्ष पोलिस पाटील लवकुश अवनुरे व तलाठी राम मुंडे यांनी पाहणी केली आहे.


27 सप्टेंबर रोजी गोदावरी नदीच्या पाण्याची झालेली वाढ पाहता मनपाच्या क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने गोदावरी नदी काठोकाठ असलेल्या वसरणी भागातील पंचवटी व शंकरनगर भागातील अनेक निवासस्थानी पाणी शिरत असल्याने आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नितीन गाढवे, यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक शेख शादुला, वसुली लिपीक मालु एनफळे,ऊतम जौधंळे, रविंद्र पवळे,विठ्ठल अंबटवार, नथुराम चवरे, नरेंद्र शिंगे यांनी ध्वनीप्रक्षेपणावरून सुचना देण्यात येऊन परिसरातील अनेक निवासस्थानी खाली करून जवळपास शंभर नागरीकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले यावेळी जेवण, राहण्याची सोय करण्यात आली. स्थलांतरीत करण्यात आलेल्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त सौ.मनिषा नरसाळे यांनी भेट दिली.

28 सप्टेंबर रोजी पाण्याचा पातळी वाढत असल्याने मनपा प्रशासनाने वसरणी ते साईबाबा कमान रस्ता बॅरिकेड्स लावुन बंद केला तर नाव घाट पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती.


सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अनेक सखल भागात पाणीच पाणी झाल्याने कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर व लगत पसरलेल्या अवस्थेत दिसत असुन तात्काळ साफसफाई करण्याची मागणी होत आहे.


