नवीन नांदेड। स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील अनुक्रमे इंदिरा गांधीं हायस्कूल हडको, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय व नरसिंह प्राथमिक शाळा सिडको,कुसूमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळा सिडको, विधानिकेतन हायस्कूल हडको, महात्मा गांधी शाळा सिडको यांच्या सह अनेक शाळेने प्रभातफेरी काढली.
यावेळी भारत माता की जय अशा घोषणांसह विविध देखावे व कलाकृती पाहण्यासाठी दुतर्फा महिला व युवक नागरीक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील अनेक शाळेने शाळे पासून मुख्य मार्गावर विविध देखावे, कलाकृती, लेझीम सादरीकरण व महापुरुष सजीव देखावा यांचा समावेश प्रभातफेरी फेरी मध्ये करण्यात आला होता.
प्रारंभी कुसूमताई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेत ध्वाजाहारोहण संस्थेचे सचिव संभाजी बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले या यावेळी शाळे पासून गुरूवार बाजार मार्ग सिडको मुख्य रस्त्यावरून संभाजी चौक मार्गे प्रभात फेरीकाढण्यात आली यावेळी विविध ठिकाणी लेझीम सादरीकरण करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. शशीकला बिरादार, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषाताई कांरामुगे, विलास बिरादार,
मेरवान जाधव, किशोर ईप्पर, एस.आर.सुर्यवंशी,पर्यवेक्षक शेख निझाम गंवडगावकर, विश्वास हंबर्डे, लक्षमण एस.के यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको व नरसिंह प्राथमिक शाळा सिडको येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी या संस्थेचे सचिव बॅरिस्टर राजीव शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर शाळा परिसरातील मुख्य मार्गावर प्रभातफेरी काढण्यात आली यावेळी मुख्याध्यापक साहेबराव देवरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एंकुडवार व्हि. ए. पर्यवेक्षक व्हि.एस.पाटील, वरिष्ठ लिपिक वसंत वाघमारे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
इंदिरा गांधीं हायस्कूल हडको येथे प्रारंभी स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय समितीचे सचिव सौ. श्वेता पाटील यांच्या हस्ते ध्वाजाहारोहण करण्यात आले यानंतर मुख्य मार्गावर प्रभातफेरी ऊत्साहात काढण्यात आली. विधानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा हडको यांच्या वतीने प्रभातफेरी ऊत्साहात राहुल नगर, शाहू नगर, वाघाळा बिजली हनुमान मंदीर मार्ग काढण्यात आली.
प्रारंभी मुख्याध्यापक विनया बेताळे यांच्या हस्ते ध ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बि.के. मटकमवार, पर्यवेक्षक जे. पी. नागठाणे ,पर्यवेक्षक हिवराळे बि. ए. यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. महात्मा गांधीं शाळा सिडको येथे ही प्रभातफेरी ऊत्साहात संपन्न झाली.