स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळेकडून ऊत्साहात प्रभात फेरी – NNL
नवीन नांदेड। स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील अनुक्रमे इंदिरा गांधीं हायस्कूल हडको, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय व नरसिंह प्राथमिक शाळा सिडको,कुसूमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळा सिडको, विधानिकेतन हायस्कूल हडको, महात्मा गांधी शाळा सिडको यांच्या सह अनेक शाळेने प्रभातफेरी काढली.
यावेळी भारत माता की जय अशा घोषणांसह विविध देखावे व कलाकृती पाहण्यासाठी दुतर्फा महिला व युवक नागरीक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील अनेक शाळेने शाळे पासून मुख्य मार्गावर विविध देखावे, कलाकृती, लेझीम सादरीकरण व महापुरुष सजीव देखावा यांचा समावेश प्रभातफेरी फेरी मध्ये करण्यात आला होता.
प्रारंभी कुसूमताई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेत ध्वाजाहारोहण संस्थेचे सचिव संभाजी बिरादार यांच्या हस्ते कर...
