हिमायतनगर,अनिल मादसवार| ओम नमः शिवाय….हर हर महादेव …जय भोलेनाथच्या गजरात सकाळी ४ वाजता हिमायतनगर येथील पुरातन कालीन मंदिरात वाढोणा वासीयांचे श्रध्दास्थान हरिहर आणि शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर मूर्तीला पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या वेदमंत्राच्या वाणीत अभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यानंतर ब्रम्हांडनायक, देवाचे देव मानल्या जाणऱ्या श्री भोळ्या शंकराच्या दर्शनासाठी श्रावणी सोमवाराचं व्रत करनाऱ्यासह हजारो पहिला- पुरुष भक्तांनी दर्शनासाठी गर्द्दी केली. सायंकाळ पर्यन्त जवळपास ३० हजार भावीकांनी दर्शन घेतल्याची माहीती मंदीर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली.
हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सर्वाधिक सण उत्सव याच महिन्यात येत असल्याने या महिन्याला व्रत वैकल्याचा महिना असेही म्हंटले जाते. पवित्र श्रावण मासाची सुरवात दि.०५ सोमवार पासुन झाली असून, पहील्या सोमवारी हजारो भावीकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिरात श्रीची भाविकांनी हळद- कुंकू, बील्वपत्र, फुलाने पुजा -अर्चना केली असून, शिवपती महादेव मंदिरातील शिवलिंगाला बिल्वपत्र आणि दुधाने अभिषेक करण्यात आला आहे. विदर्भ -मराठवाडयाच्या सिमेवर वसलेल्या हिमायतनगर (वाढोणा) शहरवासीयांचे श्रध्दास्थान श्री परमेश्वराचे मंदीर आहे. मंदीरातील भुयारात ७२० वर्षापुवीची श्री परमेश्वराची उभी मुर्ती असुन, विष्णुच्या दहा अवतारा पैकी एक अवतार आहे.
भारतात कुठेही श्री परमेश्वरा सारखी दिसणारी दुसरी मुर्ती नसल्याने वाढोण्याच्या श्री परमेश्वर दर्शनाला विदर्भ, आंध्रपदेश, कर्नाटकासह दुर – दुरहुन भावीक भकत महाशीवरात्र, श्रावण मासात अवर्जुन हजेरी लावतात. येथील शिवपती मंदीरात लक्ष्मीनारायण, भव्य शिवलीग, निद्रीस्थ नारायण, भैरवनाथ, गणपती, हनुमान, आदिंसह अन्य देवी- देवतांच्या प्राचीन मुर्त्या आहेत. मंदीराचे बांधकाम हेमाडपंथी असुन, प्रत्येक सोमवारी शेकडो भाविक एकत्र येऊन महाआरती केली जाते. आरती व दर्शनासाठी सायंकाळी शिवभकतांची मंदीयाळी होते.
वर्षभर भावीक पुजा, अर्चना, महाअभीषेक व लग्न वीधीही या ठिकाणी करतात. मंदीर परीसरात पिंपळ, वड, उंबर, गुलमोहर, लिंब, बादाम आदिसह अन्य फुलांची झाडे आहोत. हि झाडे वरून राजाच्या कृपेमुळे हिरवाईने नटली यामुळे श्रावण महिन्यात मंदीरीचे सौदर्य खुलले असून, मंदिर परीसरातील वातावरण मंगलमय झाले आहे. मंदीर संस्थानकडुन महाशीवरात्रीला १५ दिवसाची भव्य यात्रा भरवीली जाते. विशेषता श्रावण मासात दर सोमवारी सकाळी ४ वाजताच भकत अभीषेक महापुजा करन पुण्य पदरात पाडुन घेतात. दरम्यान श्रावणात मंदिर समीतीने शिवमहापुरान कथा, संत ज्ञानेश्वर माऊलींची गाथा, भागवत कथा आदी प्रबोधनात्मक कार्यकम आयोजित केले असून, दिनांक ०७ ऑगस्टपासून यास प्रारंभ होणार आहे. मंदिरातर्फे आयोजित सांगीतामय कथा श्रवणासाठी पंचकोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित होऊन लाभ घ्यावा असे वाहन मंदिर कमेटीकडून करण्यात आले आहे.
संबंध भारतात एकमेव समजल्या जाणाऱ्या हिमायतनगर वाढोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीचा शुभारंभ सकाळी ०६ वाजता ओम नमः शिवाय नामजाप यज्ञाचा बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत महिला मंडळी आणि सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पुरुष मंडळी सहभागी होत आहेत. ओम नमः शिवाय नामाचा जयजयकार करत बिल्वपत्र अर्पण करून परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन अनेकांनी या यज्ञात सहभाग घेतला आहे. अखंड महिनाभर चालणाऱ्या या यज्ञात पंचक्रोशीतील भाविकांनी सहभाग घेऊन मानव जन्माचा सार्थक करून घ्यावं असे आवाहन स्वामीजींनी केलं आहे. दरम्यान मंदिराकडून भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले असून, नामजप यज्ञात सामील झालेल्याना दुधाचे वितरण करण्यात आले आहे.