नांदेड| भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून आमदार श्रीजया चव्हाण यांची ही नियुक्ती झाली आहे. ही जबाबदारी सोपवल्याबद्दल आ. श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.


