नांदेड

The Annual General Meeting | नरसिंह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न – NNL

नवीन नांदेड| जनता शिक्षण प्रसारक मंडळ,उमरदरी ता. मुखेड जि. नांदेड संचलित या संस्थेत कार्यरत विविध शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असणारी नरसिंह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित,उमरदरी ता.मुखेड जि. नांदेड या पतसंस्थेची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव नागोराव जाधव आणि संस्थेचे उपाध्यक्ष तथा व उपप्राचार्य रवी शिवाजीराव जाधव यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक व्ही. एस. पाटील,सेवानिवृत्त प्राचार्य एन.डी. पांडे,पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ.एल.आर. कांबळे, सचिव के.व्ही.माधसवाड, खजिनदार सौ.ए.जी.देगावकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक चोंडीकर यांची आणि सर्व संचालक मंडळ सौ.एस.एस.पल्लेवाड,एस.एन.देवकर, व्ही.डी.कागणे, बी.के. सुब्बनवाड, डी.एस.वन्नाळे,सौ.एस.आर.पेकमवार आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. नागोरावजी माधव जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वसाधारण सभेस सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रवी जाधव यांनी मार्गदर्शन करतांना पतसंस्थेच्या सुनियोजित व यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करून सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या नंतर सभेस सुरुवात करण्यात आली.पतसंस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन पतसंस्थेच्या उपाध्यक्ष अध्यक्ष सौ. एल. आर. कांबळे यांनी केले.

सदरील सर्वसाधारण सभेसाठी सर्व संचालक मंडळ आणि सभासद यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य एन.डी. पांडे,चोंडीकर आणि लिपिक श्री सुभाष भवर यांचा सेवानिवृत्ती निमित्त संस्था व पतपेढीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. सभा यशस्वीतेसाठी पतसंस्थेच्या लिपिक सौ.एस. आर. पेकमवार, सौ.तारूबाई, शंकर कापसे,शबाबुराव शिंगणवाड, नामदेवराव कोनापुरे, तानाजी कोनापुरे,राम विजापुरे आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .डी.जी. पवार यांनी केले तर आभार शंकर कापसे यांनी मानले व सभेची सांगता करण्यात आली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button