श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर नगर पंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाचा तक्ता नुकताच जाहीर झाला असून, पुढचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे. या निर्णयानंतर माहूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत विविध प्रवर्गातील इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मात्र आरक्षणाच्या घोषणेनंतर अनेकांचे राजकीय स्वप्न धुळीस मिळाले आहे. दुसरीकडे, ओबीसी प्रवर्गातील तीन प्रमुख इच्छुकांमध्ये मात्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहूर शहरात गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजाचे मजबूत राजकीय अस्तित्व असून, या आरक्षणामुळे आगामी निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता नगराध्यक्षपदावर कोण बसणार, हे पाहण्यासाठी माहूरकर उत्सुक आहेत.



