वाळकेवाडी/हिमायतनगर,शंकर बरडे| हिमायतनगर गटविकास कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वाळकेवाडी गावात रस्ते,घरकुल व सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करीत आहेत. याचा सतत पाठपुरावा करुनही याकडे संबंधित अधिकारी – पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आसल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर व ग्रामविकास अधिकारी यांना दुधड-वाळकेवाडी येथिल समाज बांधवांने निवेदन देऊन आपल्या समस्या कळविल्या आहेत. जी ग्रामपंचायत आम्हाला नागरी सुविधा देत नाही तशी ग्रामपंचायत काय..? कामाची असा संतप्त सवाल वाळकेवाडी येथील वडार समाज बांधवांने केला आहे.
याबाबत सविस्तर व्रत असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दुधड-वाळकेवाडी येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्र ४ मध्ये वडार समाजाची संख्या जवळपास ४५० ते ५०० आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या समाजाकडे फक्त एक मतदार म्हणून पहिले जाते. आमच्या समुहातील नागरिकांना एकालाही एकही घराकुल दिले नाही, घरकुलच नाही तर कुठलिही सुविधा ज्यात नाली, रस्ता, सांडपाणी व्यवस्थापन, कोणतीही मूलभूत सुविधा आम्हाला दिली जात नाही.
आम्ही सर्व वडार समाजाने ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंच यांना वारंवार बोलावून घेऊन सर्व समस्या सांगितल्या. पण आमचे म्हणणे कोणीही ऐकून घेयला तयार नाही. आमच्या समस्या सोडविल्या जात नसल्याने कधी-कधी वाटते आम्ही गावाचे रहिवाशी आहोत कि..? नाही. कारण गेल्या अनेक पिढ्यापासून आम्हाला ग्रामपंचायतच्या जे काही भौतिक सुविधा मिळतात त्या पासून वंचित ठेवले जाते. या गोष्टीचा आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना देखील संबंधित ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी आमची दख्खल घेत नाहीत.
त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतच्या विरोधात पंचायत समिती कार्यालय गाठावे लागले आहे. ग्रामपंचायत स्तरावर जे काही सुविधा असतील ते पूर्ण द्याव्यात अन्यथा आम्हाला लोकशाहीचा मार्ग अवलंबावा लागेल. असा इशाराही गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी निवेदन कर्ते, संजय डुकरे, अनिल डुकरे, बालाजी देवकर, बबलू गायकवाड, राजू शिंदे, रामू धोत्रे, दिलीप वाघमारे, अजय आलेवाड, प्रमेश्वर आलेवाड, विजय डुकरे, अजय डुकरे, साईनाथ देवकर, बाबू देवकर, गोविंद देवकर, अमोल शिंदे, व युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.