नांदेड l मुक्ता साळवे बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित निर्मिती नर्सिंग कॉलेजतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.


यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच विविध वनस्पतीचे पाने आणि फुलांपासून ज्यामध्ये पळस, जास्वंद, पालक, बीटरूट, हळद, कोथिंबीर आणि मेहंदी इत्यादी वनस्पतीचा वापर करत विविध नैसर्गिक रंग तयार केले.

त्याच बरोबर सर्वांनी या रंगपंचमीला नैसर्गिक रंगाचा वापर करण्याची तसेच इतरांना देखील नैसर्गिक रंगाचा वापर करण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आणि नैसर्गिक रंग बनवणार्या सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक केले. याप्रसंगी निर्मिती नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापकांनी तसेच विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची भूमिका स्पष्ट केली आणि सर्वांनी पर्यावरपूरक होळी आणि रंगपंचमी साजरी करावी असे आवाहन केले.

यावेळी सौ. नीतिका बेद्रे, कु. शुभांगी शिंदे, कु. पलक बैनवाड, कु. शिवानी मेश्राम, डॉ. सौ. कमल मुधोळकर, कु. श्रेया भावसार, कु. पूनम मिराशे, कु. मनीषा देसाई, कु. आरती भिसे, कु. आरती बिरेवाड, कु. पूजा पदीलवाड, कु. करुणा ठोके, कु. मीनाक्षी गजभार, कु. सविता देव कांबळे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
