लोहा| तालुक्यातील लिंबोटी येथील ऊर्ध्व मानार धरणाच्या बुडीत क्षेत्रात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला त्यामूळे सुरु असलेल्या तेरा दरवाजा पैकी सोमवार (ता .२ सप्टें) पहाटे पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास ५ दरवाजे बंद करण्यात आले. तेव्हापासून सायंकाळी सात वाजे पर्यंत नऊ गेट मधून मन्याड नदी पात्रात १५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता असे उर्ध्व मानार पाटबंधारे उपविभाग लोहा चे उपअभियंता श्री फुलारी यांनी माहिती दिली
शनिवार रात्री पासून पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील लिंबीटी स्थित .ऊर्ध्व मानार धरणाचे रविवारी सायंकाळी सहा वाजल्या पासून तेरा दरवाजे ०.४८ मीटरने उचलण्यात आले होते.त्यातून ६०० क्युमेक्स म्हणजे २२हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मन्याड नदीपात्रात केला जात होता. सोमवारी . पावसाचा जोर कमी झाल्याने पहाटे चहाटे पाऊणे चार वाजता धरणाचे ५ दरवाजे बंद करण्यात आले – नऊ दरवाजातून सोमवारी सायंकाळी सात वाजे पर्यंत १५ हजार क्युसेक्स पाण्याचा निसर्ग मन्याड पात्रात केला जात होता. अभियंता श्री फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर नियंत्रक अधिकारी अभियंता रानवळकर अभियंता ए एम. राजपूत, सुनेगाव तलावाचे बीटप्रमुख बी एम खेडकर कालवा निरिक्षक एस.ई. बोरोळे यासह कर्मचारी धरणावर अहोरात्र कार्यरत आहेत. उपअभियंता फुलारी व टीम धरणाच्या णी साठ्यावर त्मक्ष ठेवून आहे.
तालुक्यातील सहा ही मंडळात अतिवृष्टी
लोहा तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.शेवडी (बा) येथे घंटे यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले सहा मंडळात झालेली अतिवृष्टी झाली यात लोहा सोनखेड, कलंबर या सर्कल मध्ये पाऊस अधिक झाला आज सर्कल निहाय झालेली अतिवृष्टी नोंद मिमी मध्ये या प्रमाणे लोहा (१५७ मिमी,) माळाकोळी( १०१.५०) ,कापशी (९७.२५), सोनखेड ( १५७.२५), शेवडी( ११४.५०)कलंबर (१५७.२५) असा पाऊस झाला आहे.
पिकांचे तात्काळ पंचनामे करा-चिखलीकर
जिल्ह्यात अनेक भागात गेल्या तीन दिवसा पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेच शिवाय शहरातील काही भागात घरात पाणी शिरले आहे. काही गावांचा संपर्क तुटला. अनेक घरांची पडझड झाली तसेच पिकांची मोठी हानी झाली असून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. तेव्हा पिकांचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी माजी खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकर मिळाली पाहिजे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे प्रतापरावांनी केली आहे.