Nine Gates of Upper Manar Limboti Dam Opened : ऊर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे नऊ दरवाजे सुरू; १५ हजार क्युसेक्स पाण्याचा निसर्ग -NNL
लोहा| तालुक्यातील लिंबोटी येथील ऊर्ध्व मानार धरणाच्या बुडीत क्षेत्रात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला त्यामूळे सुरु असलेल्या तेरा दरवाजा पैकी सोमवार (ता .२ सप्टें) पहाटे पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास ५ दरवाजे बंद करण्यात आले. तेव्हापासून सायंकाळी सात वाजे पर्यंत नऊ गेट मधून मन्याड नदी पात्रात १५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता असे उर्ध्व मानार पाटबंधारे उपविभाग लोहा चे उपअभियंता श्री फुलारी यांनी माहिती दिली
शनिवार रात्री पासून पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील लिंबीटी स्थित .ऊर्ध्व मानार धरणाचे रविवारी सायंकाळी सहा वाजल्या पासून तेरा दरवाजे ०.४८ मीटरने उचलण्यात आले होते.त्यातून ६०० क्युमेक्स म्हणजे २२हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मन्याड नदीपात्रात केला जात होता. सोमवारी . पावसाचा जोर कमी झाल्याने पहाटे चहाटे पाऊणे चार वाजता धरणाचे ५ दरवाजे बंद करण्यात आले - नऊ दरवाजातून ...
