नवीन नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या नवीन मतदार संघ नांदेड तालुक्यातील दक्षिण विधानसभा मतदार संघातील धनेगाव हा झाला असुन वाजेगाव मतदार संघातुन विभाजन करून धनेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ अस्तित्वात आला आहे यामुळे दक्षिण विधानसभा मतदार संघात आता तिनं जिल्हा परिषद संघ व सहा पंचायत समिती गण झाले आहेत, नव्याने झालेल्या जिल्हा परिषद मतदार संघाचे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व सरपंच, विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व संभाव्य उमेदवार यांनी प्रशासनाचे आभार मानुन आनंद व्यक्त केला असुन विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर वाजेगाव सर्कल मध्ये ऊतर मतदार संघातील पाच गावांचा समावेश असल्याची प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे.


राज्य शासनाच्या निवडणूक विभागाने वाढलेल्या लोकसंख्या अधारे जिल्हा परिषद नांदेड यांच्यी पुर्वी असलेली जिल्हा परिषद गट संख्या 63 वरून दोन जिल्हा परिषद गट वाढवून 65 केली आहे,यात नांदेड तालुक्यातील दक्षिण विधानसभा मतदार संघातील नव्याने धनेगाव जिल्हा परिषद मतदार संघाच्या समावेश आहे तर अर्धापूर तालुक्यातील एक मतदार संघ वाढला आहे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक अनुषंगाने निवडणूक विभागाने प्रारूप मतदार संघातील जिल्हा परिषद गट प्रसिद्ध केले यात या नव्या दोन गटांचा समावेश केला आहे ,प्रारूप यादी प्रसिद्ध नंतर नव्याने होणाऱ्या जिल्हा परिषद धनेगाव मतदार संघातील या मतदारसंघात धनेगाव, मुझामपेठ, फतेपुर, ईलीचपुर, पिंपळगाव मिश्री, वडगाव, तुप्पा, काकांडी तर्फे तुप्पा,राहेगाव,भायेगाव,किक्की,बाभुळगाव हेमलतांडा जयसिंग तांडा यांच्या समावेश आहे.


नव्याने झालेल्या मतदार संघाबाबत वाजेगाव माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी लोकसंख्या वाढीवर वाजेगाव मतदार संघातील विभाजन करून नव्याने धनेगाव जिल्हा परिषद मतदार संघ केल्या बद्दल प्रशासनाचे आभार मानले तर भाजपा विधानसभा दक्षिण प्रमुख बालाजी पाटील पुणेगावकर यांनी नव्याने झालेल्या मतदारसंघा मुळे विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर शिवसेना शिंदे गटाचे विघमान भायेगाव सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी नव्याने झालेल्या मतदारसंघाचे अभिनंदन करून विकासाला चालना मिळेल तर कांकाडी माजी सरपंच सुदीन बागल यांनी या मतदार संघा मुळे एकत्र गावे आल्याने विकासाला चालना मिळेल तर सरपंच प्रतिनिधी तथा शिवसेना ऊबाठा गटांचे विधानसभा प्रमुख हणमंत भवर पाटील यांनी नव्याने झालेल्या धनेगाव मतदार संघातील अनेक गावांत विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.


विभाजन होऊन नवीन होत असलेल्या जिल्हा परिषद मतदार संघात गावे कमी झाल्याने शासनाच्या विविध योजना सह विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया धनेगाव ग्रामपंचायत सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटु पाटील शिंदे, यांनी तर गंगाधर कवाळे,भाजपा दक्षिण मंडळ ग्रामीण अध्यक्ष विश्वंभर शिंदे,तुप्याचे माजी ऊपसरपंच बबनराव कदम यांच्या सह अनेकांनी व्यक्त केला आहे,वाजेगाव जिल्हा परिषद मतदार संघात नव्याने पाच गावांसह एकुण आठरा गावे तर बळीरामपुर मध्ये 14 गावे आहेत.



