नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका यांच्या वतीने आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर धारकांना आता नव्याने देण्यात आलेल्या ब्लु टुथ प्रिंटर चा सहायाने तात्काळ पावती देण्यात येणार असून आॅनलाईन नोंद तात्काळ होणार असून शुक्रवारी हे प्रिंटर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सर्व मालमत्ता वसुली लिपीक यांना मिळाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून मनपा हद्दीत मालमत्ता कर वसुली लिपीक यांच्या मार्फत पावती आधारे जमा करण्यात येत होता व जमा झालेली रक्कम आॅनलाईन नोद ही होत नव्हती, मालमत्ता करा संदर्भात आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी मालमत्ता विभागासाठी नव्याने ब्लु टुथ प्रिंटर घेण्याचा निर्णय घेतला व मनपाच्या संगणक विभागा मार्फत सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसुली लिपीक यांना हे प्रिंटर देण्यात आले आहे.
शुक्रवारी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त संभाजी कासटेवाड यांच्या हस्ते हे प्रिंटर देण्यात आले, यावेळी कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक संजय नागापूरकर, मारोती सारंग, प्रकाश दर्शने,मालु एनफळे, लोखंडे ,महेंद्र पठाडे नथुराम चौरे, रमेश यशवंतकर, उपस्थित होते. सदरील प्रिंटर मुळे मालमत्ता क्रमांक टाकल्यानंतर तात्काळ पावती मिळणार असून कर्मचारी वेळ वाचणार असुन मोबाईल वर मॅसेज येणार आहे.