नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी जिल्हा उपाध्यक्ष *पांडुरंग शिंदे मांजरमकर यांना नायगाव तालुकाध्यक्ष* पदाची जबाबदारी दिली.


पांडुरंग शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये शेतकरी ,शेतमजूर, व ग्रामीण भागातील अनेक प्रश्न घेऊन सातत्याने आंदोलने करत आहेत. नायगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्यांची जाण असणाऱ्या आणि आक्रमक व अभ्यासू नेतृत्व म्हणून पक्षाने त्यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही निवड महत्त्वाचे मानली जाते.


यावेळी जिल्हा सरचिटणीस डी.बी जांभरुणकर , महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष रावणगावकर,धर्माबाद तालुकाध्यक्ष दिलीप कदम, धर्माबाद शहराध्यक्ष जावेद जबोरोदिन,रवींद्र शेट्टी, बी.ए.गोणारकर, धर्माबाद महिला तालुकाध्यक्ष राजश्री सूर्यवंशी, धर्माबाद महिला शहर अध्यक्ष आरती चव्हाण, माजी नगरसेवक सुधाकर जाधव, महिला शहर उपाध्यक्ष मीना भद्रे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व स्तरातून पांडुरंग शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.




