छत्रपती संभाजीनगर| नुकत्याच संपूर्ण देशभर १०० डेज ऑफ रनींग (HDOR ) हि स्पर्धा झाली . यामधेय जवळपास ५०,००० पेक्षा जास्त धावपटू ने सहभाग नोंदवला . हि स्पर्धा २१ एप्रिल पासून सुरु झाली होती व ०४ ऑगस्ट ला संपली . या मध्ये दर रोज किमान २ कि. मी धावणे आवश्यक आहे, तरच ते रेकॉर्ड तुमच्या अँप मध्ये नोंद होते. स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हा आहे कि धावपटूना एक शिस्त लागावी , उन्हाळ्यात पण त्यांचे धावणे सुरु राहावे व त्यांचे रोज चे किलोमीटर मोबाईल अँप मध्ये रेकॉर्ड होऊन , ते राष्ट्रीय , राज्य व शहरात कुठल्या पातळीवर आहे या चा अन्दाज येतो ,व एकमेकांना धावताना बघून एक उत्साह व प्रेरणा मिळते .
शहरातले तीन नामवंत डॉक्टर यानी देखील या मधेआपले नाव नोंदवले व ती स्पर्धा यशस्वीरीत्या 100 दिवसही दररोज धावून पूर्ण केली . डॉ सुनील देशमुख (प्रोफेसर , कान नाक घसा विभाप्रमुख ) यानी ४०३ कि. मी , डॉ प्रफ्फुल जटाळे (न्यूक्लिअर मेडिसिन व पेट -सिटी स्कॅन तज्ज्ञ ) यानी १००८ कि.मी आणि डॉ सचिन जोशी (छाती विकार तज्ज्ञ ) यांनी ६०० कि.मी , १०० दिवसात पूर्ण केले . या त्यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमा बद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे डीन डॉ शिवाजी सूक्रे सर, सिग्मा चे डायरेक्टर डॉ उन्मेष टाकळकर , IMA छ संभाजी नगर चे प्रेसिडेंट डॉ उज्वला दहिफळे , डॉ विकास देशमुख आणि सर्व सहयोगी डॉक्टरयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे . आपल्या व्यस्त जीवनात डॉक्टर देखील व्यायामाला वेळ देऊन समाजासाठी एक आदर्श बनतात .
आपल्याला सर्व वैद्यकीय तज्ज्ञ लोक सांगतात की न चुकता रोज थोडा वेळ रनिंग एक्सरसाइजसाठी काढल्यामुळे अनेक फायदे होतात. डेली जाॅगिंग किंवा रनिंग करणारी व्यक्ती हेल्दी असण्यासोबत मेंटेली फिट असते. धावताना नेहमी एखादा छोटा गोल सेट करावा आणि तो अचिव्ह करण्याचा प्रयत्न करावा. हळू हळू आपले उद्दिष्ट वाढवावे. दररोज छोटे-छोटे उद्दीष्ट पूर्ण होत असल्यामुळे आपण मोटिव्हेटेड होतो. एका प्रकारे, धावल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो असे म्हणता येते. या पाॅझिटिव्ह एनर्जीचा परिणाम दिवसभर अवती-भवती राहिल्यामुळे प्रत्येक दिवस चांगला जातो.
रनिंग एक्सरसाइज संबंधित महत्त्वपूर्ण बाबी:
रनिंग एक्सरसाइजचे बेनिफिट्स मिळवायचे असल्यास या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
॰ दिवसातून 30 मिनिटे धावणे आवश्यक आहे.
॰ आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस तरी धावण्याचा सराव करावा.
॰ महिन्यातील काही दिवस रेस्टसाठी काढून ठेवावेत.
धावण्याचे विविध फायदे
• बौद्धिक आरोग्य : उतार वयात वाढत्या वयानुसार आपली बौद्धिक क्षमता आणि आरोग्य कमी होऊ लागते. धावण्यामुळे ते कमी होत नाही.
• तणावमुक्ती : आपल्या धकाधकीच्या आयुष्यात स्ट्रेस वाढला आहे. …
• आत्मविश्वास : पळण्यामुळे आपला आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढतो.
• मूड सुधारतो : तुमचा मूड जर खराब असेल तर लगेच घराबाहेर पडा आणि पळा. …
• झोप चांगली येते