राष्टीय पातळीवरील १०० डेज ऑफ रनींग छ. संभाजी नगर येथील 3 डॉक्टरानी केली पूर्ण – NNL
छत्रपती संभाजीनगर| नुकत्याच संपूर्ण देशभर १०० डेज ऑफ रनींग (HDOR ) हि स्पर्धा झाली . यामधेय जवळपास ५०,००० पेक्षा जास्त धावपटू ने सहभाग नोंदवला . हि स्पर्धा २१ एप्रिल पासून सुरु झाली होती व ०४ ऑगस्ट ला संपली . या मध्ये दर रोज किमान २ कि. मी धावणे आवश्यक आहे, तरच ते रेकॉर्ड तुमच्या अँप मध्ये नोंद होते. स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हा आहे कि धावपटूना एक शिस्त लागावी , उन्हाळ्यात पण त्यांचे धावणे सुरु राहावे व त्यांचे रोज चे किलोमीटर मोबाईल अँप मध्ये रेकॉर्ड होऊन , ते राष्ट्रीय , राज्य व शहरात कुठल्या पातळीवर आहे या चा अन्दाज येतो ,व एकमेकांना धावताना बघून एक उत्साह व प्रेरणा मिळते .
शहरातले तीन नामवंत डॉक्टर यानी देखील या मधेआपले नाव नोंदवले व ती स्पर्धा यशस्वीरीत्या 100 दिवसही दररोज धावून पूर्ण केली . डॉ सुनील देशमुख (प्रोफेसर , कान नाक घसा विभाप्रमुख ) यानी ४०३ कि. मी , डॉ प्रफ्फुल जटाळे (...
