नांदेड| दिवाळी, दसरा व छठ या सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची सोय करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने नांदेड – तिरुचानूर – नांदेड दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या विशेष भाडे (साधारण भाड्याच्या 1.3 पट) दराने धावणार आहेत.


गाड्यांचे वेळापत्रक :
- गाडी क्रमांक 07039 नांदेड – तिरुचानूर विशेष
- कालावधी : 16 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025
- सुटण्याचा दिवस : प्रत्येक मंगळवार
- वेळ : सायंकाळी 4.50 वाजता नांदेड येथून सुटेल
- मार्ग : मुदखेड, बासर, निझामाबाद, अर्मुर, लिंगमपेट जग्तीयाल, करीमनगर, पेद्दपल्ली, जमिकुंता, वरंगल, मह्बुबाबाद, दोर्णकाल, खम्मम, मधीरा, विजयवाडा, तेनाली, चीराला, ओंगोल, नेल्लोर, रेणीगुंठा मार्गे
- गंतव्य : दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता तिरुचानूर येथे आगमन
- फेऱ्या : एकूण 3
- गाडी क्रमांक 07040 तिरुचानूर – नांदेड विशेष
- कालावधी : 17 सप्टेंबर 2025 ते 01 ऑक्टोबर 2025
- सुटण्याचा दिवस : प्रत्येक बुधवार
- वेळ : सायंकाळी 6.40 वाजता तिरुचानूर येथून सुटेल
- मार्ग : आलेल्या मार्गानेच परत
- गंतव्य : दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.00 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे आगमन
- फेऱ्या : एकूण 3
या गाड्यांमध्ये स्लीपर, वातानुकुलित (एसी) आणि जनरल असे मिळून 22 डबे असणार आहेत.

प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन, नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.



