नवीन नांदेड l नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीला गेलेल्या पाच दुचाकी मोटार सायकल जप्त केल्या असून एका आरोपीस अटक केली आहे,या उल्लेखनिय कामगिरी बाबत वरीष्ठांनी अभिनंदन केले आहे.


या प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार,अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल मोटार सायकल चोरी,घरफोडी, दरोडासारखे गुन्हे उघडकीस आणनेबाबत सर्व पोस्टे,प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.


फियांदी मिर्झा मुसबवीर मिर्झा अफसर बेग, वय 30 वर्ष, व्यवसाय खाजगी नौकरी, रा. निमरा मस्जीदीच्या जवळ गाडेगाव रोड नांदेड यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे तक्रार दिली की, दिनांक 07 जुनं 25 रोजी रात्री 19:30 ते 20:00 वाजताचे दरम्यान त्यांच्या घरासमोर निमरा मस्जीद जवळ गाडेगाव रोड ता.जि. नांदेड येथे लावलेली पल्सर मोटार सायकल क्रमांक MH-26-CD-6257 किंमती 60,000/- रुपयाची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली वगैरे तक्रारी वरुन नमुद प्रमाणे दाखल गुन्हयात ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, बाबुराव चव्हाण, ज्ञानेश्वर मटवाड व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तांत्रीक व कौशल्यपुर्ण तपास करुन गोपनीय माहीतीच्या आधारे मोटार सायकल चोर अमेरखान पि. गोलूखान वय 24 वर्ष, रा.पाण्याच्या टाकीजवळ चौफाळा ता.जि.नांदेड याच्या मुसक्या आवळून गुन्हयाची उकल करुन त्याचेकडून गुन्हयांत चोरी गेलेली पल्सर मोटार सायकल क्र. MH-26-CD-6257 किंमती 60,000/- रुपयाची. व इतर 04 मोटार सायकली अशा मिळून एकूण किंमती 2,35,000/- रुपयाच्या मोटार सायकल जप्त केल्या आहेत. त्याचेकडुन जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकल हया कोणत्या ठिकाणाहून चोरी केल्या आहेत याबाबत अधिक तपास चालु आहे.


वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे अविनाश कुमार,पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे,पोउपनि. बाबुराव चव्हाण, पोउपनि.ज्ञानेश्वर मटवाड, पाहेकों /प्रमोद करहाळे, पोका विठ्ठल भिसे, पोका संघरत्न गायकवाड, पोकों शंकर माळगे, पोकों ज्ञानेश्वर कलंदर सर्व नेमणूक पोलीस स्टेशन नांदेड यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.



