नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पंकज नगर धनेगाव येथे तिरट नावांचा जुगार खेळत असतांना सहा आरोपींना अटक करून मोबाईल फोन,मोटार सायकल यासह जुगाराचे असे एकुण 2 लाख 65 हजारांच्या मुद्देमाल जप्त करून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड व त्याचा पथकाने ही कार्यवाही केली असून या कार्यवाहीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व वरीष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.


अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.त्या अनुषंगाने ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व पथकातील अंमलदार हे दिनांक 27 रोजी वेळ 17.25 वा. सुमारास पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनीय माहीती मिळाल्यावरुन नमुद पथकाने पंकज नगर धनेगाव येथे बाळु भंगारे यांचे घराशेजारी तिर्रट नावाच्या चालु असलेल्या जुगार अड्यावर छापा कारवाई केली असता वर नमुद आरोपी हे जुगार खेळताना मिळुन आल्याने त्यांचेकडुन नगदी रुपये मोबाईल फोन, मोटारासायकल व जुगाराचे साहीत्य असा एकुण 2,65,500/- रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन नमुद आरोपींतावर वर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सतार शेख मगदूम यांच्या फिर्यादीवरून सहा आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे . अविनाश कुमार, पोलीस अधिकारी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्ये अभिनंदन केले आहे.



