नांदेड, अनिल मादसवार| आगामी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणुक अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैद्य व्यवसायावर कारवाई करणे, एनबीडब्ल्यु वॉरंट बजावणी करणे व प्रतिबंधक कारवाई तसेच इतर कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 15.10.2024 ते दिनांक 25.10.2024 दरम्यान खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
तसेच नांदेड जिल्हयातील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे कडुन गुन्हेगारांना प्रतिबंध व स्थानबध्द करून निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी कलम 126,129 बीएनएनएस प्रमाणे एकुण 1504, एमपीडीए अंतर्गत एकुण 03, कलम 55 मपोका प्रमाणे 02 प्रतिबंधक कारवाई करण्यात आले आहेत. व कलम 55 चे 04. 56 मपोका प्रमाणे एकुण 32. कलम 57 मपोका 01. कलम 93 मुंदाका प्रमाणे 116 प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच सदर कालावधीत एनबीडब्ल्यु वॉरंट 365 बजावण्यात आलेले आहेत. लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुक भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी आतापर्यंत शस्त्र परवाना धारकाकडुन 938 शस्त्र जमा करण्यात आले आहेत.
आगामी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीचे पार्श्वभुमीवर नांदेड जिल्हयात सिमा सुरक्षा बलाचे 02 व सशस्त्र सिमा बलाचे 02 असे एकुण 04 कंपनी आलेले आहेत. सदर सिमा सुरक्षा बल व सशस्त्र सिमा बल जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी ठेवण्यात येणार असुन त्यांच्याकडुन व स्थानिक पोलीसांकडुन पथसंचलन (रूटमार्च), एरिया डॉमीनेशन, व इतर निवडणुक अनुषंगाने शांतता अबाधित राखण्यासाठी एकत्रिक संयुक्तरित्या सर्व पोस्टे स्तरावर सुनियोजित पध्दतीने इतर सुरक्षा विषयक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. सदरची कारवाई अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व मा. श्री उदय खंडेराय, पोनि स्थागुशा व सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांनी केली आहे.